अयोध्येत मंदिर कधी होणार?; भाजपच्या खासदाराचा प्रश्न

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

भाजप संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज झाली. मोदी व शहा दोघेही दिल्लीबाहेर असल्याने उपस्थित नव्हते. या दोघांशिवाय संसदीय बैठक होण्याचा हा विरळा प्रसंग होता. बैठकीनंतर संसदीय कामकाजमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी तोंडी तलाक कायद्याबाबत माहिती दिली तसेच हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच मंजूर करण्यास सरकारचे प्राधान्य असल्याचेही सांगितले.

नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच गेली २६ वर्षे राममंदिर या मुद्द्यावर वातावरण तापविणाऱ्या भाजपला आता या विलंबाबद्दल घरचाच आहेर मिळू लागला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाह या भाजपच्याच खासदारांनी ‘मंदिर कधी बनणार?’ असा जाहीर सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अनुपस्थितीत बैठकीच्या अध्यक्षपदी असलेले गृहमंत्री राजनाथसिंह यांनी, ‘ही सर्वांचीच इच्छा आहे. सबुरीने काम घ्या. थोडी वाट पाहा,’ असे संयमित उत्तर दिले.

भाजप संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज झाली. मोदी व शहा दोघेही दिल्लीबाहेर असल्याने उपस्थित नव्हते. या दोघांशिवाय संसदीय बैठक होण्याचा हा विरळा प्रसंग होता. बैठकीनंतर संसदीय कामकाजमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी तोंडी तलाक कायद्याबाबत माहिती दिली तसेच हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच मंजूर करण्यास सरकारचे प्राधान्य असल्याचेही सांगितले. १९८४ ची शीखविरोधी दंगल व ‘राफेल’ व्यवहाराच्या न्यायालयीन निकालांबाबतही प्रसाद यांनी खासदारांना माहिती दिली. राजनाथसिंह यांनी मार्गदर्शन केले. संसदीय कामकाजात सहभागी होणे आवश्‍यक असल्याचेही खासदारांना पुन्हा सांगितले गेले.

तथापि तोमर यांनी राममंदिराचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाल्याचे पत्रकारांपासून दडवून ठेवल्याचे तेव्हा स्पष्ट झाले जेव्हा स्वतः राजभर यांनीच आपण हा मुद्दा जाहीरपणे मांडल्याचे सांगितले. घोसी मतदारसंघातून निवडून आलेले राजभर म्हणाले, की ‘होय, मी आजच्या बैठकीत मंदिर कधी बनणार’, याबाबत माहिती देण्याची विनंती केली.

जनताच मंदिर बनवेल - तोमर
राममंदिर हा श्रद्धेचा प्रश्‍न आहे. वादग्रस्त वास्तू पाडण्यासाठी कोणाची परवानगी घेतली होती? सरकारची घेतली होती की सर्वोच्च न्यायालयाची घेतली होती? मग आता जेव्हा वादग्रस्त वास्तूच तेथे नाही तेव्हा मंदिर निर्माणाचे काम त्वरित सुरू झाले पाहिजे, अशी जनभावना आहे. आम्ही लोकांत फिरतो तेव्हा लोक आम्हाला हेच प्रश्‍न विचारतात व आज मी तेच बैठकीत मांडले. मंदिरासाठी कोणाच्या परवानगीची गरजच नाही. जनताच मंदिर बनवेल. मात्र कायद्याची बाबही विचाराधीन आहे, असेही तोमर यांनी नमूद केले.

Web Title: When will there be a Ram temple in Ayodhya says BJP MP