esakal | "ज्या शाळेत महिला शिक्षक जास्त तिथं भांडणं जास्त"; शिक्षणमंत्र्याचं अजब विधान
sakal

बोलून बातमी शोधा

school

"ज्या शाळेत महिला शिक्षक जास्त तिथं भांडणं जास्त"; शिक्षणमंत्र्याचं अजब विधान

sakal_logo
By
अमित उजागरे

जयपूर : राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी महिला शिक्षकांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं ते चर्चेत आले आहेत. "ज्या शाळेत महिला शिक्षकांचं प्रमाण जास्त असतं तिथं भांडणंही जास्त होतात" असं विधान त्यांनी आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलं. त्यांच्या अजब विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हेही वाचा: लहान मुलांसाठी आपत्कालीन वापराला 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी

शिक्षण मंत्री डोटासरा शिक्षकांना संबोधित करताना म्हणाले, "सरकारने प्रत्येक ठिकाणी महिलांना प्राधान्य दिलं आहे. महिलांनी थोडा अधिक प्रयत्न केला तर त्या आणखी पुढे जाऊ शकतात. आमच्याकडे अनेक शिक्षक येतात आणि म्हणतात शहराजवळच्या शाळेत आम्हाला नियुक्ती द्या, त्यावर आम्ही सांगतो तिथं जागा शिल्लक नाही. यावर ते म्हणतात, जागा कशी असेल सर्व महिला शिक्षकांना शहराजवळच्या शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येते."

हेही वाचा: निवडून मानवाधिकाराचे मुद्दे उचलणारे देशाची प्रतिमा मलिन करताहेत - PM

महिलांसाठी सरकारने अनेक चांगली धोरणं आखली आहेत. निवड आणि बढतीमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पण अनेक लोकांना हे रुचत नाही. ते विचारतात, "आम्ही चांगलं शिकवत नाही का? पण मी आपल्याला सांगू इच्छितो की, तुमच्यामध्ये (महिला शिक्षक) आपसात भांडणंही जास्त होतात. ज्या शाळेमध्ये महिला शिक्षकांचं प्रमाण जास्त झालं की तिथं सगळा गोंधळच असतो"

loading image
go to top