आता, मोदींसाठीच काम करणार- अमर सिंह

whether i am accepted by bjp or not i will be working for modi says amar singh
whether i am accepted by bjp or not i will be working for modi says amar singh

लखनऊ : समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह हे भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा जोर धरत असतानाच, स्वतः अमर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपसोबत जाईल किंवा नाही हा निर्णय अमित शहा यांचा आहे. परंतु, यापुढे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

अमर सिंह यांनी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षावर ते जातीयवादी पक्ष असल्याची टीका केली. त्याचबरोबर, अखिलेश यादव किंवा मायावती यांच्यासोबत जाण्यापेक्षा ते मोदी आणि योगी अदित्यनाथ यांच्यासोबत काम करणे पसंद करतील. 

दरम्यान, गेल्या वर्षी लखनऊमध्ये एका राजकीय सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर सिंह यांची स्तुती केली होती. त्यावेळी अमर सिंह यांनीही त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देताना मोदींचे भाषण एकून त्यांना महात्मा गांधीची आठवण आल्याचे सांगितले होते. तत्पूर्वी, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय समाज पक्षाचे नेते सुहेलदेव यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमर सिंह यांना आझमगढ़मधून लोकसभा निवडणुक लढण्याची विनंती केली असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com