जवानांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका: कॉंग्रेस

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

आपण आपले डझनावर जवान गमावत अहोत. स्थानिकांची मोठी जिवित आणि वित्तहानी होत आहे. दिवाळीमध्येच आमच्या हरियानातील जवानाने देशासाठी प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले. हरियानाच्या मातीतील जवानाने त्याचे बलिदान वाया जाईल का की केंद्र सरकार पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

- कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली : कुपवाडा सेक्‍टरमध्ये शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानाचे बलिदान वाया जाऊ देऊ नये आणि केंद्र सरकारने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसने केले आहे.

नियंत्रणरेषेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शनिवारी पंजाब रेजिमेंटमधील मनदीपसिंह जवान हुतात्मा झाला. दहशतवाद्यांनी पळून जाताना त्यांच्या पार्थिवाची विटंबना केली होती. हे जवान हरियानातील होते. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "आपण आपले डझनावर जवान गमावत अहोत. स्थानिकांची मोठी जिवित आणि वित्तहानी होत आहे. दिवाळीमध्येच आमच्या हरियानातील जवानाने देशासाठी प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले.' तसेच "हरियानाच्या मातीतील जवानाने त्याचे बलिदान वाया जाईल का की केंद्र सरकार पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे', असेही सुरजेवाला पुढे म्हणाले.

दरम्यान मनदीपसिंहचे गाव दु:खात बुडाले असून या घटनेचा बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या प्रकाराबद्दल पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे आश्‍वासन दिले आहे.

Web Title: whether sacrifice by our soldier will get wasted or will the government give a befitting reply to Pakistan