आधारक्रमांक शेअर करताना काळजी घ्या : यूआयडीएआय

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

आधारची नोंदणी करताना आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती देत असतो. तसेच मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, पासपोर्टशी आधार लिंक केल्यानंतर संबंधितांची माहिती मिळते. त्यामुळे यापुढे हे सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. 

नवी दिल्ली : 'युनिक आयडेंटिटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया'ने (यूआयएडीएआय) आधार क्रमांक शेअर करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आधारकार्डवर असलेल्या क्रमांकावरून संबंधित कार्डधारकाची वैयक्तिक माहिती मिळते. त्यामुळे यापुढे आधारक्रमांक शेअर करताना काळजी घ्यायलाच हवी, असे 'यूआयडीआयए'ने स्पष्ट केले. 

AADHAR

सध्या विविध ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. त्यामुळे आपण अनेकदा संबंधित ऑनलाइन साइटवर आधारक्रमांक देतो. हे करताना सतर्कता बाळगण्याचे यूआयडीआयएने सांगितले आहे. नागरिक त्यांची वैयक्तिक माहिती इंटनेटवर शेअर करतात. काही सेवा पुरविणाऱ्यांकडून त्यांची वैयक्तिक माहिती मागविली जाते. मात्र, हे डिजिटली करताना त्यांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे, असे यूआयडीएआयने सांगितले. 

आधारची नोंदणी करताना आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती देत असतो. तसेच मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, पासपोर्टशी आधार लिंक केल्यानंतर संबंधितांची माहिती मिळते. त्यामुळे यापुढे हे सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. 

Web Title: whlie sharing Aadhar Number must takes precautions says UIDAI