मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

टीम ई सकाळ
Monday, 13 January 2020

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणाऱ्या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल कोण आहेत?

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात काल (ता.१२) 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यानंतर मोठा वादही झाला. भाजपनेते जय भगनवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जय भगवान गोयल कोण आहे?
जय भगवान गोयल हे दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते असून राष्ट्रवादी शिवसेना या पक्षसंघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जय भगवान गोयल यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना या शहरात श्रीहरीराम गोयल आणि पिस्तादेवी हिंदू-बनिया या दाम्पत्यांच्या घरी झाला. जय भगवान गोयल हे सध्या भाजपचे सदस्य असले तरी ती पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आहेत.  १९८२ ते १९८७ या काळात ते शिवसेना सदस्य होते. त्यांनंतर उत्तर दिल्ली शिवसेनाप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १९८८ ते १९९० या काळात ते दिल्ली शिवसेना शाखेचे प्रमुख होते. उत्तर दिल्ली विभागाचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून तब्बल १८ वर्षे (१९९० ते २००८) त्यांच्यावर जबाबदारी होती.

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध

२००८ मध्ये मात्र, महाराष्ट्र सदनप्रकरणी झालेल्या वादामुळे जय भगवान गोयल यांनी शिवसेना सोडली. यावर त्यांनी लिहलेल्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून वाद झाल्यानंतर शिवेसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊत म्हणाले, 'जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

Image may contain: 11 people, people smiling, people standing and indoor

शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शिवसेना पक्ष संघटनेची स्थापना केली. ते या पक्षसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २०१४ आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is aaj ke shivaji narendra modi Books Writer Jay Bhagwan Goayal