आम्हाला विचारणारे अमित शहा कोण

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

"कोण आहेत शहा, जे निधीचा विनियोग कसा झाला याचे प्रमाणपत्र मागत आहेत. हा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या कार्यालयालाने देखील या प्रमाणपत्राबाबत आम्हाला आणखी विचारले नाही." केंद्र सरकारकडून मिळालेल्या 2 हजार 500 कोटी रुपयांमधून अमरावती शहराच्या विकसासाठी एक विटही खरेदी केली नाही.

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी होणाऱ्या अमरावती शहरात विकास कामे सुरू आहेत. या कामासाठी केंद्राकडून मिळालेल्या निधीचा खर्च कसा करण्यात आला याचे प्रमाणपत्र मागणारे अमित शहा कोण आहेत. अशा शब्दात तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा यांना उत्तर दिले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी, अमरावती शहरासाठी केंद्राकडून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग कसा करण्यात आला याचे प्रमाणपत्र नायडू यांनी जमा केले नसल्याचा आरोप केला होता.

 त्या आरोपाला दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना नायडू यांनी उत्तर दिले. नायडू म्हणाले, "कोण आहेत शहा, जे निधीचा विनियोग कसा झाला याचे प्रमाणपत्र मागत आहेत. हा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या कार्यालयाने देखील या प्रमाणपत्राबाबत आम्हाला आणखी विचारले नाही." केंद्र सरकारकडून मिळालेल्या 2 हजार 500 कोटी रुपयांमधून अमरावती शहराच्या विकसासाठी एक विटही खरेदी केली नाही. राज्याचा यासंदर्भातील मास्टर प्लॅनही तयार झालेला नाही. हा मास्टर प्लॅन सिंगापुरमध्ये पडून आहे. 

काही दिवसांपुर्वी महानाडू येथे झालेल्या टीपीडीच्या वार्षीक कार्यकर्ता मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी बोलतानाही नायडू म्हणाले होते, "अमित शहा हे केवळ एका पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार आहेत. त्यांना आंध्र प्रदेश सरकारला केंद्राकडून मिळालेला निधी कसा खर्च झाला हे विचारण्याचा अधिकार नाही."
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who is amit shah, said chandrababu naidu