देवभूमीला लूटभूमी बनविले : मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

श्रीनगर (उत्तराखंड) : उत्तराखंड सरकार तरुणांच्या महत्वाकांक्षांशी खेळ करत आहेत असे म्हणत 'लोककल्याणाचा विचार न करणारे राज्य कसे करू शकतात?' असा प्रश्‍न उपस्थित करून काँग्रेसने देवभूमीला लूटभूमी बनविल्याचे टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी केली.

श्रीनगर (उत्तराखंड) : उत्तराखंड सरकार तरुणांच्या महत्वाकांक्षांशी खेळ करत आहेत असे म्हणत 'लोककल्याणाचा विचार न करणारे राज्य कसे करू शकतात?' असा प्रश्‍न उपस्थित करून काँग्रेसने देवभूमीला लूटभूमी बनविल्याचे टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी केली.

येथील एका निवडणूक प्रचार सभेत मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तराखंडमधील सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. "ज्या राज्यात पर्यटन आणि अन्य क्षेत्र विकसित करण्याची क्षमता आहे, अशा राज्यातही "काँग्रेस सरकारने विकासाची दृष्टी ठेवली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगढ, झारखंडसोबतच उत्तराखंडची निर्मिती केली होती. मग उत्तराखंडकडे एवढी मोठी क्षमता असताना हे राज्य मागे का?' उत्तराखंडच्या निर्मितीला काँग्रेसने विरोध का केला? जे लोककल्याणाचा विचार करू शकत नाहीत ते राज्य कसे करू शकतात?', असे प्रश्‍न मोदी यांनी यावेळी उपस्थित केले. "उत्तराखंडच्या विकासाला आमचे प्राधान्य आहे. आम्ही विकासाच्या मार्गाने पुढे जात आहोत यात आम्हाला तुमची साथ हवी आहे', असे आवाहनही यावेळी मोदींनी केले.

यावेळी मोदी यांनी उपस्थित केलेले मुद्दे -

  • अलिकडेच निर्माण झालेली छत्तीसगढ आणि झारखंड ही राज्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली विकासाकडे वाटचाल करत आहेत.
  • वेळ बदलली आहे. दिल्लीमधील (केंद्र) सरकार बदलले आहे. माझ्या देशाचा सैनिक आता वार सहन करणार नाही, तर प्रतिवार करत आहे.
  • आम्ही प्रयत्नाच्या प्रत्येक व्यवस्थेला प्राथमिकता देऊ इच्छितो. आपण मला केंद्रात बसवले आहेत. मी ही माझी जबाबदारी सांभाळणार आहे.
  • सर्व ऋतुंमध्ये रस्त्यांद्वारे आम्हाला उत्तराखंड संपूर्ण देशाशी जोडायचा आहे. चारधामसाठी आम्ही 1200 कोटी रुपये दिले.
  • "सर्जिकल स्ट्राईक' नंतर पाकिस्तानने विचारण्या आधी आपल्याच लोकांनी विचारले "मोदीजी पुरावा काय आहे?' आपल्या राजकीय नेत्यांना लष्कराच्या पराक्रमाचे पुरावे कशाला हवे आहेत?
  • ज्यांना पद मिळाले त्यांनी लुटण्याची संधी सोडली नाही. या देवभूमीला लूटभूमी बनविले. कॅमेऱ्यामध्ये देवाण-घेवाण करताना पकडले गेले.
  • गेली 70 वर्षात शक्तिशाली लोकांनी देशाला लुटले. त्यांना वाटत होते हा चहावाला काय करणार? ते खूपच शक्तिशाली लोक आहेत.
  • पण माझ्यासोबत 125 कोटी लोकांच्या शुभेच्छा होत्या आणि त्यामुळेच मी या (ज्यांनी देशाला लुटले अशा) लोकांविरुद्ध लढलो.
Web Title: Who cannot think well of the people here, how can they govern?: Modi