शेतकऱयांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे होणार नुकसान : राजू शेट्टी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल अशी व्यक्तीच देशावर राज्य करेल, असे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच शेतकरी ज्या व्यक्तीला पाठिंबा देतील त्या व्यक्तीचीच देशात सत्ता येईल. त्यामुळे जी व्यक्ती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करेल, त्याचे नुकसानच होईल, असेही शेट्टी म्हणाले. 

देशभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी कायदा मंजूर करावा आणि शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी देशभरातील विविध भागांतील शेतकरी राजधानी दिल्लीत पोचले आहेत. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी खासदार शेट्टी दिल्लीत दाखल झाले आहेत.

शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर शेट्टी म्हणाले, जीएसटीसाठी विशेष अधिवेशन घेतले जाते तर मग शेतकऱ्यांसाठी असे का केले जात नाही, जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन पार पडले. त्यासाठी दोन्ही सभागृह एकत्र येतात. त्यानंतर जीएसटीला मान्यता मिळते. असे होत असले तर मग शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन का नाही, असा सवाल शेट्टींनी यावेळी केला. तसेच जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल, अशी व्यक्तीच देशावर राज्य करेल, असेही शेट्टी म्हणाले.  

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

Web Title: Who ignore Farmers will get losses says Raju Shetty