राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल होतोय ती पार्टी कोणाची होती माहितीये? Rahul Gandhi Latest Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Controversial Video

राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल होतोय ती पार्टी कोणाची होती माहितीये?

Rahul Gandhi Controversial Video: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत नवा वाद सुरु आहे. या वादामागे त्यांची नेपाळ भेट कारणीभूत ठरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी सोमवारी काठमांडूला गेले होते. तेथे त्यांनी मैत्रिण सुम्निमा उदास (Sumnima udas) हिच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. राहुल त्यांच्या तीन साथीदारांसह मॅरियट हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राहुल गांधी नेपाळमधील त्यांची मैत्रीण सुम्निमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला आले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये राहुल काही लोकांसोबत पार्टीमध्ये दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूचे लोक दारू पीत आहेत. सुम्निमाचे लग्न निमा मार्टिन शेर्पासोबत होणार आहे.

हेही वाचा: राहुल गांधी नाईटक्लबमध्ये काय करतायत? काँग्रेसने दिलं उत्तर

राहुल गांधींच्या या व्हायरल व्हिडिओबाबत (Viral Video on Social Media) भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण राजस्थान जळत असताना चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळला गेल्याचे सांगितले आहे. भाजप राहुल गांधींना अनावश्यक मुद्द्यांवर घेरते आहे. सुम्निमाचे वडील भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधींना मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते. भीम उदास हे नेपाळचे म्यानमारमधील राजदूत राहिले आहेत.

हेही वाचा: नेपाळच्या नाईटक्लबमध्ये दिसले राहुल गांधी, व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका

सुम्निमा उदास सीएनएन इंटरनॅशनलच्या दिल्ली बेस पत्रकार आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी कव्हर केल्या आहेत. अमेरिकेतील ली विद्यापीठातून त्यांनी पत्रकारिता केली आहे. याशिवाय त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. याशिवाय त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराचे प्रकरणही त्यांनी कव्हर केले.

CNN वेबसाइटवर नोंदवलेल्या प्रोफाइलनुसार, सुम्निमा उदास यांनी 2014 मध्ये लिंग समस्येवर कव्हरेजसाठी अमेरिकन जर्नलिस्ट ऑफ द इयर पुरस्कार देखील जिंकला होता. भारतातील खेड्यापाड्यातील गुलामगिरीवर रिपोर्ट सादर करण्यासाठी एका टीमला 2012 मध्ये गोल्डन ईगल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुम्निमा या त्या संघाचा महत्त्वाचा भाग होत्या.

Web Title: Who Is Sumnima Udhas Whose Wedding Attended By Rahul Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top