Yakub Memon: ज्याच्या कबरीच्या सजावटीवरुन वाद पेटलाय तो याकुब मेमन कोण होता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yakub Memon

Yakub Memon: ज्याच्या कबरीच्या सजावटीवरुन वाद पेटलाय तो याकुब मेमन कोण होता?

दहशतवादी याकुब मेमन याची कबर चक्क लायटिंग आणि संगमरवर फरशीने सजवण्यात आल्याने वातावरण चांगलचं तापलंय पण तुम्हाला माहिती आहे का हा याकुब मेमन कोण होता?याकुब मेमन हा १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी होता. ज्याला 30 जुलै 2015 रोजी येथील नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.

हेही वाचा: Yakub Memon: याकुब मेमन कबर सजावटीवरुन भाजपा आक्रमक; "उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी..."

याकूब मेनन याचं पुर्ण नाव याकूब अब्दुल रज्जाक मेमन होते. याकूब चा जन्म 30 जुलै 1962 ला मुंबई येथे झाला. तो पेशाने चार्टर्ड अकाउंटट होता. मेमन कुटूंबात याकूब सर्वात जास्त सुशिक्षित होता.

सन १९९३, मुंबईत ठिकठिकाणी बाँब ब्लास्ट झाले. कित्येक निर्दोष लोकांचे जीव गेले. त्यावेळी हजारो लोक जखमी होते. या घटनेने देशात हाहाकार माजला. या घटनेमागील एक नाव समोर आलं, ते होतं याकुब मेमनचं. याकुब हा या बाँब ब्लास्टमधील मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता. नेपाल च्या काठमांडू येथुन 1994 ला याकूबला पकडण्यात आले. पुढे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले.

हेही वाचा: Yakub Meman: मेमनच्या कबरीची सजावट; रक्तपात घडवणाऱ्याचं उदात्तीकरण?

मेमन यांच्या वकीलांनी फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेत बदलण्याची मागणी केली. पण त्यांच्या वकीलांच काहीही एक ऐकण्यात आले नाही आणि अखेर त्याच्या वाढदिवशीच 30 जुलै 2015 रोजी त्याला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता.

सीरियल बाँम ब्लास्टमध्ये निर्दोषांना मारणाऱ्या याच याकूब मेननच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याने आता देशभरातून रोष व्यक्त केला जातोय.

Web Title: Who Is Yakub Memon Mumbai Blast Terrorist Grave Decoration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..