राजस्थानमध्ये पायलट की गेहलोत?

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा इतिहासही आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेस 104 जागांवर पुढे असून, भाजप काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला आहे. 

जयपूर- राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा इतिहासही आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेस 104 जागांवर पुढे असून, भाजप काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला आहे. 

राजस्थानमध्ये गेल्या 5 वर्षांपासून भाजपच्या वसुंधरा राजे या मुख्यमंत्री आहेत. आता काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाल्यावर राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री पदासाठी राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहोलोत यांचे नाव चर्चेत आहे.

1) सचिन पायलट- वयाच्या 26 व्या वर्षी निवडुन आलेले पायलट हे भारताचे सर्वात लहान संसद सदस्य ठरलेले आहेत. तसेच ते राजस्थान काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्षदेखिल आहेत. सचिन पायलट हे काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मर्जीतले आणि युवानेतृत्व असल्याने त्यांचे पारडे मुख्यमंत्री पदासाठी जड मानले जात आहे.

2) अशोक गेहोलोत- गेहोलोत हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. डिसेंबर 1998 ते डिसेंबर 2003 या काळात ते पहिल्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री होते. तर ते दुसऱ्यांदा डिसेंबर 2008  ते डिसेंबर 2013 या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होते. एकूण दहा वर्षाचा अनुभव असल्या कारणाने मुख्यंमंत्री पदासाठी त्यांनाही प्रमुख दावेदार मानले जात आहे.

Web Title: Who is the new CM in rajsthan Ashok Gehlot or Sachin Pilot