कोरोनावर 'इव्हर्मेक्टिन' औषध प्रभावी? WHO नं दिलं स्पष्टीकरण

कोरोनावर 'इव्हर्मेक्टिन' औषध प्रभावी? WHO नं दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात आणि जगभरात सध्या कोरोना विषाणूचा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर अद्याप कोणतंही 100 टक्के प्रभावी असं औषध प्राप्त झालेलं नाहीये. सध्या कोरोनावरील उपचारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर ट्रायल म्हणूनही केला जात आहे. यासंदर्भातीलच एका औषधाबाबत आता थेट जागतिक आरोग्य संघटनेने खुलासा केला आहे. आरोग्य संघटनेनं म्हटलंय की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन या औषधाचा वापर करु नये. याबाबत संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट केलं आहे. हे औषध न वापरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याआधी नुकतेच मार्च महिन्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं इव्हर्मेक्टिन कोरोनावर अतिशय कमी परिणामकारक असल्याचा दावा केला होता. गोवा राज्यामध्ये गेल्या सोमवारी 18 वर्षांवरील सर्वांना हे औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनावर 'इव्हर्मेक्टिन' औषध प्रभावी? WHO नं दिलं स्पष्टीकरण
काय होती पोखरण अणू चाचणी; कसं वाढलं होतं भारताचं सामर्थ्य?

त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, नव्या लक्षणांसाठी कोणत्याही प्रकारचं औषध वापरण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता जाणून घेणं महत्वाचं आहे. जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही चाचण्यांशिवाय कोरोनाच्या उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन औषध वापरण्यास परवानगी देत नाही. डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी हा इशारा देताना जर्मनीच्या मर्क या हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस कंपनीचे एक जुनी माहिती शेअर केली आहे. त्यामध्ये संशोधक कोरोनाच्या उपचारांसाठी इव्हर्मेक्टिनच्या परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन करत आहे. आतापर्यंत तरी कोरोनाच्या उपचारांसाठी हे औषध उपयोगी ठरेल याप्रकारचं कोणतंही प्रमाण अभ्यासादरम्यान मिळालं नसल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

काय आहे इव्हर्मेक्टिन औषध?

इव्हर्मेक्टिनला अन्न आणि औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. हे मलेरियासारख्या आजारांच्या उपचारांसाठी औषध म्हणून वापरले जाते. कोरोनावरील उपचारांसाठी अजून पर्यंत तरी इव्हर्मेक्टिनला मान्यता मिळाली नसली तरी अनेक ठिकाणी याचा वापर केल्याने रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरल्याचं काही ठिकाणी आढळून आलं आहे.

ऍक्टीव्ह रुग्ण होताहेत कमी; केंद्राचा दावा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी माहिती दिली आहे. मंत्रालयाने म्हटलंय की, देशातील 13 राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक ऍक्टीव्ह रुग्ण आहेत तर 17 राज्यांमध्ये 50 हजारांहून कमी ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने घटताना दिसून येत आहे. यामध्ये अंदमान-निकोबार द्वीप, आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगढ, छत्तीसगढ, दमन आणि दीव, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, लडाख, लक्षद्वीप, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. मात्र, देशातील काही राज्ये अशीही आहेत, जिकडे दैनंदिन रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटका, केरळ, मनिपूर, मेघालया, नागालँड, ओडीसा, पुदुच्चेरी, पंजाब, तमिळनाडू, त्रिपूरा आणि पश्चिम बंगाल ही ती राज्ये होत. इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी जाहिर केलंय की, रॅपिड एँटीजन टेस्ट्स सरकारी आणि खासगी आरोग्य सुविधांमध्ये उपलब्ध होतील तसेच त्यासाठी कोणतीही मान्यता आवश्यक नाहीये. पुढे त्यांनी अशीही माहिती दिली की, 30 एप्रिल रोजी 19,45,299 चाचण्या केल्या गेल्या जो एक जागतिक विक्रम आहे. सध्याचा भारताचा पॉझिटीव्हीटी रेट हा 21 टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com