कॉंग्रेसचा उत्तराधिकारी पुढील आठवड्यात

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली - कॉंग्रेसची कार्यकारिणी बैठक पुढील आठवड्यात संसद अधिवेशन समाप्तीनंतर होणार आहे. या बैठकीत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींचा उत्तराधिकारी कोण असेल, याचा निर्णय होऊ शकतो. 

संसदेच्या अधिवेशनाचा समारोप सात ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल, असे आज पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. कॉंग्रेसच्या सर्व सरचिटणीसांची बैठक आज पक्ष मुख्यालयात झाल्यानंतर मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी कार्यकारिणी बैठकीबाबतची माहिती दिली. अर्थात, बैठकीचा अजेंडा आणि तारीख अद्याप ठरलेली नाही. सरचिटणीसांच्या बैठकीत प्रियांका गांधीही सहभागी झाल्या होत्या. 

लोकसभा निवडणूक निकालानंतर लगेच 25 मे रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकारिणीने राजीनामा फेटाळला असला, तरी राहुल गांधींनी निर्णयात बदल नाही, असे तीन जुलैच्या पत्राद्वारे स्पष्ट केले. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कॉंग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. 

राहुल यांच्या स्पष्टोक्तीनंतर कॉंग्रेसमध्ये नवा अध्यक्ष कोण असावा, याची चर्चा सुरू होऊन तरुण अध्यक्ष की हंगामी ज्येष्ठ अध्यक्ष, असे पर्यायही अनौपचारिकरीत्या पुढे आले. यामध्ये मुकुल वासनिक, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांच्यापर्यंत अशी नावेही चर्चेत आली. मधल्या काळात मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे मिलिंद देवरा यांनीही राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका बजाविण्यास तयार असल्याची जाहीर इच्छा व्यक्त केली होती. आता प्रियांका गांधींकडे अध्यक्षपद सोपवा, या कॅप्टन अमरिंदरसिंग, शशी थरूर यांनी केलेल्या मागणीने जोर धरला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who will be the next Congress successor