Loksabha 2019 : 'मग सगळ्या मोदींना नातेवाईक का म्हणू नये?'

Akhilesh Yadav
Akhilesh Yadav

गाझियाबाद : सगळ्या यादवांना तुम्ही नातेवाईक म्हणत असाल, तर मग सगळ्या मोदींना नातेवाईक का म्हणू नये, अशी बोचरी टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. बँकांचे पैसे बुडवून परदेशात गेलेला नीरव मोदी हा मग मोदींचाच नातेवाईक आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अखिलेश म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोलिसांनी मला लखनौ विमानतळावर रोखले. मग, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारखे बँकांचे पैसे बुडवून जाणारे लोक परदेशात जात असताना त्यांना का रोखले नाही. भाजपने 2014 मध्ये दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नोटाबंदी, जीएसटी यामुळे वाईट अवस्था आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com