बिहारमधील माती खरेदीची चौकशी करा : भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि बिहारमधील मंत्री तेज प्रताप यादव यांनी संजय गांधी बायोलॉजिकल पार्कसाठी खरेदी केलेल्या माती प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

पाटना (बिहार) - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि बिहारमधील मंत्री तेज प्रताप यादव यांनी संजय गांधी बायोलॉजिकल पार्कसाठी खरेदी केलेल्या माती प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सय्यद अबू दोजाना यांच्या मालकीच्या मेरिडियन कन्स्ट्रक्‍शन (इंडिया) लि. या कंपनीकडून सगुना मोरजवळ एका मॉलचे काम सुरू आहे. मॉलच्या तळमजल्याच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यातून निघालेली माती संजय गांधी बायोलॉजिकल पार्कने 90 लाख रुपयांना खरेदी केली' कोणतीही निविदा प्रक्रिया न करता खरेदी करण्यात आलेल्या या माती खरेदी प्रकरणाची निष्पक्षपापणे चौकशी करण्याची मागणी मोदी यांनी केली आहे.

डिलाईट मार्केटिंग कंपनी प्रा. लि. ही कंपनी संबंधित मॉल उभारत आहे. या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये लालूपुत्र आणि बिहारमधील मंत्री तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात माती खरेदी केल्याची माहिती संजय गांधी पार्कमधील अधिकाऱ्यांनी दिली. या खरेदीसाठी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, ही खरेदी मॉल उभारणाऱ्या कंपनीकडून खरेदी केली नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: Why Did Patna Zoo Buy Soil For 44 Lakhs? BJP Says Lalu's Son Must Explain