ते अमित शहांवर छापा का टाकत नाहीत?: बॅनर्जी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

कोलकाता : तमिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर टीका करत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर छापा का टाकत नाहीत?, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

ट्‌विटरद्वारे बॅनर्जी यांनी टीका केली आहे. "अलिकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रधान सचिवावर छापा टाकण्यात आला. आता तमिळनाडूच्या मुख्य सचिवांवर छापा टाकण्यात आला. अशी सूडाची, अनैतिक आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीची कारवाई का करण्यात येते? हा प्रकार केवळ संघराज्य व्यवस्था अस्थिर करण्यासाठी आहे. ते पैसा जमा करत असल्याबद्दल अमित शहा आणि इतरांवर छापे का टाकत नाहीत? भ्रष्टाचाराचा तीव्र निषेध करायलाच हवा. मात्र केंद्र सरकारच्या संस्थांनी तमिळनाडूच्या मुख्य सचिवांवर छापा टाकण्याचा प्रकार म्हणजे नागरी सेवा प्रमुखांचा अवमान आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणतीही कारवाई करताना राज्य सरकारला विश्‍वासात घेऊन संबंधित व्यक्तीला पदावरून हटवून नियमाप्रमाणे योग्य ती प्रक्रिया पार पाडायला हवी', अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Web Title: Why don't they raid Amit Shah and others who are collecting money?