कोरियात वयगणनेच्या तीन तऱ्हा; नागरिकांच्या वयाबाबत संभ्रम

कोरियामध्ये सध्या एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. जुनी पद्धत बदलून उर्वरित जगाच्या बरोबरीने वयगणना करण्याची पद्धत ही समिती तयार करत आहे.
korean
koreangoogle

मुंबई : जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाचं वय मोजण्याची पद्धत जगभर सारखीच असताना दक्षिण कोरिया मात्र याला अपवाद आहे. त्यांच्याकडे जन्माला आलेलं प्रत्येक मूल एक वर्षाचं मानलं जातं. त्यानंतर जसजसे कॅलेंडरमधील वर्ष पुढे सरकेल तसतसे बाळाचे वय वाढत जाते. म्हणजेच डिसेंबरमध्ये जन्माला आलेले बाळ पुढील काही आठवड्यांतच दोन वर्षांचे होते.

korean
कोरियन चहा प्या... प्रतिकारशक्ती वाढवा!

कोरियाच्या राष्ट्रपती पदावर नव्याने नियुक्त झालेले Yoon Suk-yeol यांनी आता वयगणनेची जुनी कोरियन पद्धत बदलण्याचे ठरवले आहे. कोरियामध्ये सध्या एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. जुनी पद्धत बदलून उर्वरित जगाच्या बरोबरीने वयगणना करण्याची पद्धत ही समिती तयार करत आहे.

जुन्या कोरियन पद्धतीमुळे कोरियन नागरिकांच्या वयाबाबत सतत संभ्रम निर्माण होत असतो. याची आर्थिक आणि सामाजिक किंमतही या देशाला मोजावी लागते. प्रस्तावित बदलांचे काही जणांनी स्वागत केले आहे; मात्र त्याची अंमलबजावणी केली जाईल का याबाबत काहींना साशंकता वाटत आहे.

korean
कोरियन स्पायसी चिकन करा ट्राय

वयगणनेच्या तीन तऱ्हा

खरेतर १९६२ पासून या देशाने प्रशासकीय कामकाजासाठी आंतरराष्ट्रीय पद्धत स्वीकारली आहे. पण त्यांच्याकडे इतरही पद्धती अस्तित्त्वात आहेत.

एका पद्धतीमध्ये बाळ जन्मल्यावर शून्य वर्षाचे असते व दर जानेवारीला त्याचे वय वाढत जाते. म्हणजे डिसेंबर २०२०मध्ये जन्मलेले बाळ जानेवारी २०२२ मध्ये दोन वर्षांचे होते. ही पद्धत लष्करी भरती, बालगुन्हेगाराला शिक्षा देणे अशा कायदेशीर बाबींसाठी वापरली जाते.

तिसऱ्या पद्धतीला कोरियन एज म्हणतात. यानुसार जन्माला आलेले बाळ एक वर्षाचे असते व नवे वर्ष सुरू झाल्यावर त्याचे वय वाढते. या तिन्ही पद्धतींचा विचार करता mega K-pop band BTS's Kim Tae-hyung aka V याचे वय आंतरराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे २६, कोरियन एजप्रमाणे २८ आणि अन्य पद्धतीप्रमाणे २७ आहे.

korean
Korean Fashion Trend : कोरियन मुली इतक्या फॅन्सी कशा राहतात, जाणून घ्या सिक्रेट

एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना आदराने बोलण्यासाठी त्याचे वय माहीत असणे ही कोरियन नागरिकांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. कोरियाच्या या पद्धतीची मुळे खरेतर चीन आणि आशियातील इतर काही भागांत आहेत; मात्र कोरिया या एकाच देशाने ही पद्धत जिवंत ठेवली आहे.

करोना प्रतिबंधक लस देण्याची वेळ आली तेव्हा कोरियन नागरिकांच्या वयाबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे वयगणना पद्धतीच्या प्रमाणीकरणाचा प्रयत्न सुरू झाला आहे. याआधी २०१९ आणि २०२१ या वर्षीही असे प्रयत्न झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com