इंधन दरवाढीबाबत जे अंदमानला जमते ते महाराष्ट्राला का नाही?

Why is Maharashtra not able to get the Andamans fuel price
Why is Maharashtra not able to get the Andamans fuel price

मुंबई : इंधन दरवाढ ही आता नित्याचीच झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील लोकांना पेट्रोल केवळ 69 रुपयांनी मिळत आहे. त्यामुळे जे अंदमानला जमतंय ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न सामन्य जनतेतून उपस्थित होत आहे.

अंदमान-निकोबरमध्ये व्हॅटचा दर सर्वांत कमी म्हणजे 6 टक्के असल्याने पेट्रोल आणि डिझेल जवळपास 20 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात इंधनावर सर्वांत जास्त कर लादला जात आहे. महाराष्ट्रात 35 टक्क्यांपेक्षा जास्त वॅट आकारला जातो. महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यातील इंधनाच्या दरात मोठी तफावत दिसून येते. 

कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणानंतर पेट्रोलचा दर 38 ते 40 रुपये असा असतो. त्यावर केंद्र सरकारचा 19 रुपये 48 पैसे उत्पादन शुल्क आकारला जातो. त्यावर पंपचालकांचे जवळपास 3 रुपये कमिशन आणि शेवटी राज्य सरकारचा व्हॅट लावून अंतिम किंमत ठरते. सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारच्या व्हॅटसह 9 टक्के दुष्काळी अधिभारही लावण्यात येतो. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात पेट्रोलवरील कर 39.12 तर डिझेलवरील कर 24.78 टक्के एवढा आहे. यावरुन स्पष्ट दिसून येते की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले म्हणून खास असा फरक पडत नाही. 

महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्याचा विचार करायचा झाल्यास केवळ आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोनच राज्यात 35 टक्क्यांपेक्षा जास्त वॅट आकारला जातो. तर, गुजरातमध्ये पेट्रोलवर 25.45 तर डिझेलवर 25.55 टक्के वॅट आकारला जातो. कर्नाटकमध्ये पेट्रोलवर 30.28 तर डिझेलवर 20.23 टक्के वॅट आकारला जातो. तर गोव्यात पेट्रोलवर केवळ 16.66 तर डिझेलवर 18.88 टक्के एवढा वॅट आकारला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com