210 रुपयांना खरेदी केलेली लस सामान्यांना 250 रुपयांना दिली जात आहे : पृथ्वीराज चव्हाणांचा आराेप

हेमंत पवार
Wednesday, 3 March 2021

अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. या देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या विमा योजनांचा किंवा अर्थसंकल्पीय तरतुदीचा आधार घेतला जात आहे. 

कऱ्हाड : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या (Covid 19 Vaccine) एक मार्चपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आक्षेप घेतला आहे. 35 हजार कोटींची अर्थसंकल्पीय घोषणा आणि भारत लशीचा सर्वात मोठा पुरवठादार असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात घालत आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.
 
कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 45 किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रामध्ये लस देण्यात येईल. त्यामध्ये केंद्र शासनाने लशीची किंमत 250 रुपये प्रतिडोस इतकी ठेवली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाने एक कोटी 65 लाख कोटी लशीचे डोस खरेदी केले होते. 12 फेब्रुवारीला लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार प्रत्येक डोसची किंमत 210 रुपये होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात लसीकरण मोहिमेसाठी 35 हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील आणि 75 कोटी लोकसंख्येचे लसीकरण करता येईल, असे म्हटले आहे. 

भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्‍य आहे, तरीही केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे? अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. या देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या विमा योजनांचा किंवा अर्थसंकल्पीय तरतुदीचा आधार घेतला जात आहे. 

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना (आयुष्मान भारत) मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी. 

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

वीज तोडणी थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन; भाजपच्या लढ्याला मोठं यश 

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही

खुर्च्या झिजवण्यापेक्षा राजीनामा द्या : राजेंद्र यादव

सौरभ पाटलांच्या तोंडाला कुलूप होते का? भाजप नगराध्यक्षा आक्रमक

 

Edited By : Siddharth Latkar

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why is modi govt charging common people for covid 19 vaccine prithviraj chavan satara trending news