एक मे पूर्वी लाल दिवा का काढू? : सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

व्हीआयपी संस्कृती संपविण्याच्या दृष्टिने एक पाऊल म्हणून केंद्र सरकारने प्रतिष्ठित व्यक्तींच्या वाहनावरील लाल दिव्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी एक मे पासून लागू होणार आहे. दरम्यान अनेक अधिकारी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनावरील दिवा हटविला आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लाल दिव्याचा मोह सुटत नसल्याचे दिसत असून "एक मे पूर्वी मी लाल दिवा का काढू?', असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

बंगळूर : व्हीआयपी संस्कृती संपविण्याच्या दृष्टिने एक पाऊल म्हणून केंद्र सरकारने प्रतिष्ठित व्यक्तींच्या वाहनावरील लाल दिव्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी एक मे पासून लागू होणार आहे. दरम्यान अनेक अधिकारी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनावरील दिवा हटविला आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लाल दिव्याचा मोह सुटत नसल्याचे दिसत असून "एक मे पूर्वी मी लाल दिवा का काढू?', असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, "मी आताच लाल दिवा का काढावा? तो एक मे पासून काढण्यात येईल. ज्यावेळी आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल त्यावेळी मी दिवा काढून टाकेल.' अशाच प्रकारची प्रतिक्रिया कर्नाटकमधील कायदा मंत्री टी. बी. जयचंद्रा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "कॅबिनेटने असा निर्णय घेतला हे खरे आहे. या निर्णयाचा पाठपुरावा करण्यासाठी अंमलबजावणीचे आदेश काढायला हवेत. हे प्रकरण केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. केवळ कॅबिनेटने निर्णय घेतला असून दुसरे काहीही घडलेले नाही. लाल दिवा हटविण्यासाठी एक मे ही मुदत आहे. केवळ आदेश आल्यानंतरच दिवा हटविण्याचा आग्रह धरायला हवा.'

Web Title: Why should I remove it, Karnataka CM Siddaramaiah on red beacon