मेहुल चोकसीकडून पैसे का घेतले? भाजपचा काँग्रेसला सवाल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला.

नवी दिल्ली - राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळाल्याचा गंभीर आरोप भाजपकडून काँग्रेसवर करण्यात आला. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला. चीनकडून राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले गेले असा प्रश्न जे पी नड्डा यांनी विचारला.  

जे पी नड्डा म्हणाले की, मी सोनियाजी यांना सांगू इच्छितो की कोरोनचे कारण पुढे करत चीनबाबतच्या मुळ प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न करू नका. भारताचे सैन्य देशाचे आणि आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे असंही त्यांनी सांगितलं. RCEP चा भाग होण्याची गरज होती का? चीनसोबत भारताचे व्यापारातील नुकसान 1.1 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 36.2 बिलियन अमेरिकन डॉलर कसं झालं? असा सवालही भाजपने विचारला आहे. 

चीनकडून देणगी मिळाल्याच्या आरोपावर काँग्रेसने केला खुलासा

भारतातील राष्ट्रीय काँग्रेस आणि चीनमधील कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांच्यात जवळचे संबंध काय आहेत? दोघांमधील समझोता काय? स्वाक्षरी केलेला आणि स्वाक्षरी न केलेल्या Mou काय आहे? देशाला याची माहिती हवी आहे असंही जे पी नड्डा म्हणाले. काँग्रेसला प्रश्न विचारताना जे पी नड्डा म्हणाले की, मेहुल चोकसीकडून राजीव गांधी फाउंडेशनसाठी पैसे का घेण्यात आले? मेहुल चोकसीला कर्ज देण्यासाठी मदत का करण्यात आली असाही सवाल जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत विचारला. 

देशातील 130 कोटी लोकांना जाणून घ्यायचं आहे की काँग्रेसनं सत्तेत असताना काय काम केलं आणि कशा प्रकारे देशाच्या विश्वासाचा घात केला असंही जेपी नड्डा म्हणाले. काही दिवसांपूरवी ट्विट करून राजीव गांधी फाउंडेशनवर प्रश्न उपस्थित केले होते. आज पी चिदबरम म्हणत आहेत की फाउंडेशन पैसे परत देईळ. देशाचे माजी अर्थमंत्री जे स्वत: जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्याकडून हे स्वीकारलं पाहिजे की देशाच्या हिताविरोधात फाउंडेशनने नियमांचे उल्लंघन करत निधी घेतला असाही आरोप जेपी नड्डा यांनी केला. 

नेहरू आणि मोदी : तेच ते आणि तेच ते (श्रीराम पवार)

चिदंबरम यांनी राजीव गांधी फाउंडेशनवर केल्या जाणाऱ्या आरोपनंतर ट्विट केलं होतं. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की,  भाजप अध्यक्ष जेपी नड्डा अर्धसत्य बोलण्यात तरबेज आहेत. माझे सहकारी रणदीप सुरजेवाला यांनी काल त्यांचं सत्य बाहेर आणलं आहे. राजीव गांधी फाउंडेशनला 15 वर्षांपूर्वी मिळालेल्या अनुदानाचा आणि मोदी सरकारच्या नेतृत्वात चीनने भारतीय भूभाग बळकावल्याचा काय संबंध आहे?, असा सवाल त्यांनी केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why you take donation in Rajiv Gandhi Foundation from Mehul Choksi says bjp to congress