पतीच्या वाढदिवशीच पत्नीचा अपघाती मृत्यू

पतीच्या वाढदिवशीच पत्नीचा अपघाती मृत्यू

मुरगाव : नव्या वर्षाच्या आरंभदिनी बायणा वास्को येथील दीपाली देवराज बटा या 29 वर्षीय विवाहित महिलेचा अपघाती मृत्यू झाला. माटवे दाबोळी येथील महामार्गावरील एका झाडाच्या कोसळलेल्या छोट्याशा फांदीमुळे हा अपघात झाला. विशेष म्हणजे दीपाली यांच्या पतीचा वाढदिवस होता. तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मयत दीपाली आणि तिचे पती देवराज बटा पणजीहून स्कूटरने आपल्या बायणा येथील घरी परतत असताना हा अपघात घडला. कुठ्ठाळी वास्को महामार्गाच्या माटवे दाबोळी येथील महामार्गावरील एका झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली. त्या फांदीला धडकून देवराजचा तोल गेला आणि पत्नी रस्त्यावर पडली. त्यात पत्नी दीपालीच्या डोक्याला जबर मार बसून ती निपचित पडली. तिला चिखली इस्पितळात उपचारासाठी आणले असता डाॅक्टरांनी तिला मृत्त घोषित केले.

अपघाताची माहिती वेर्णा पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी धावून गेले. तथापि तत्पूर्वीच तिला उपचारांसाठी चिखली सरकारी इस्पितळात दाखल केले होते. पण तिचा मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी दीपालीचा विवाह झाला होता. मयत दीपाली वास्कोतील विविध सामाजिक संस्थाशी संबंधित होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते.

या अपघाताचा पंचनामा वेर्णा पोलिसांनी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. शवविच्छदनेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

दरम्यान, कुठ्ठाळी वास्को महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे निष्पाप लोकांच्या मृत्यूचे कारण बनली असून, गेल्या वर्षी रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारवर नारळाचे झाड कोसळून एका महिलेला जीव गमवावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com