नवराच म्हणतो, बॉससोबत लैंगिक संबध ठेव !

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

एका ३४ वर्षीय महिलेने नोकरीमध्ये बढती मिळवण्यासाठी बॉस सोबत लैंगिक संबध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या पतीविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अहमदाबाद - एका ३४ वर्षीय महिलेने नोकरीमध्ये बढती मिळवण्यासाठी बॉस सोबत लैंगिक संबध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या पतीविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अहमदाबादच्या नारानपूरा भागात राहणाऱ्या पतीची ही मागणी नाकरल्यानंतर पतीने आणि सासऱ्याने आपल्याला मारहाण केली, असा आरोप या महिलेने केला आहे.

माझा पती अनैसर्गिक संबधासाठी सतत माझ्यावर जबरदस्ती करतो, असे पीडित महिलेने नारानपूरा पोलिस चौकीमध्ये दाखल केलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. सदर पीडित महिलेचा पती एका मोटार वितरकाकडे नोकरी करतो. त्या दांपत्याला दोन अपत्ये आहेत.

विवाहानंतर पहिली चारवर्ष सर्व व्यवस्थित सुरु होती. परंतु, काही वर्षानंतर नवऱ्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या सासऱ्याचे आणि नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असून दुसऱ्या महिलांवर ते पैसे उधळतात. त्यांनी माझे दागिनेही विकले आहेत, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.  

माझ्या इच्छेशिवाय पतीने मला दारु प्यायला आणि सिगारेट ओढायला लावली. माझ्याबरोबर त्याने अनेकदा जबरदस्तीही केली आहे. आता माझा पती नोकरीमध्ये बढती मिळवण्यासाठी त्याच्या बॉसबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत आहे, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Wife accuses man of forcing her to sleep with his boss