'शी' असला नवरा नको गं बाई...

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

प्रत्येक जोडप्याची घटस्फोटाची कारणे वेगवेगळी असतात. येथील एका महिला वेगळ्याच कारणावरून घटस्फोटापर्यंत पोहचली आहे.

भोपाळ : संसारामध्ये पती-पत्नीला एकमेकांच्या आवडी-निवडी खटकत असतात. कधी-कधी त्या एवढ्या ताणल्या जातात की त्या घटस्फोटापर्यंत पोहचतात. प्रत्येक जोडप्याची घटस्फोटाची कारणे वेगवेगळी असतात. येथील एका महिलेने पतीच्या दाढी व आंघोळीच्या कारणावरून घटस्फोटापर्यंत पोहचली आहे.

सध्या दाढी वाढवण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. महाविद्यालयीन युवकांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण दाढी ठेवताना दिसतात. परंतु या दाढीने भोपाळमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचा संसार घटस्फोटापर्यंत नेऊन ठेवला आहे. दोघांचे तीन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला. वर्षभर दोघांनी सुखी संसार केला. परंतु, त्यानंतर नवऱ्याने दाढी वाढवण्यास सुरवात केली. पत्नीला ही दाढी खटकू लागली. या दाढीमुळे दोघांमध्ये वादा-वादी सुरू झाली.

"नवरा दाढी करत नाही, थंडी असल्याचे कारण पुढे करुन आंघोळ करत नाही, परफ्यूम लावून अंगाला येणारा दुर्गंध लपवण्याचा प्रयत्न करतो," या कारणांवरून या पत्नीने आपल्या नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पत्नीने घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतरही पतीने माघार घेतली नाही. पत्नीच्या अर्जावर पतीने न्यायालयाला स्पष्ट उत्तर दिले, त्याने म्हटले आहे की, 'काहीही झाले तरी दाढीला ब्लेड लावणार नाही. मी, कसे जगायचे, काय करायचे, हे मी ठरवेन, या गोष्टी मला बायकोने सांगायची गरज नाही.'

Web Title: wife alleged that her husband did not shave and taking bath she applied for divorce from him at bhopal