'पत्नी आजारी, मुलगा परदेशात', सिसोदिया यांच्या वकिलांचा युक्तीवाद; पण, सीबीआय... | wife is ill and son is abroad manish sisodias lawyer told the court cbi protested | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manish sisodia

Manish Sisodia : 'पत्नी आजारी, मुलगा परदेशात', सिसोदिया यांच्या वकिलांचा युक्तीवाद; पण, सीबीआय...

नवी दिल्ली - दिल्लीच्या कथित 'मद्य धोरण घोटाळ्यात' तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी न्यायालयाला जामीन मंजूर करण्याची विनंती केली. मनीष सिसोदिया यांची पत्नी आजारी असून त्यांची काळजी घेणारे कोणी नाही, असे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले.

सिसोदिया यांचा मुलगाही परदेशात आहे, अशा परिस्थितीत मनीष सिसोदिया यांना मानवतेच्या आधारावर जामीन देण्यात यावा. मात्र, मनीष सिसोदिया यांच्या वकिलाच्या या विनंतीला सीबीआयने विरोध केला आहे.

जामिनाला विरोध करताना सीबीआयने सांगितले की, मनीष सिसोदिया हे दिल्ली सरकारमध्ये इतके मोठे पद भूषवतात की ते पुरावे केवळ लपवू शकत नाहीत तर नष्टही करू शकतात. यावर मनीष सिसोदिया यांच्या वकिलाने सांगितले की, मनीष सुरुवातीपासून तपास यंत्रणांना सहकार्य करत असून त्यांना जामीन मिळाल्यास भविष्यातही ते सहकार्य करतील.

विशेष म्हणजे अंमलबजावणी संचालनालय प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या वतीने जामीन याचिका दाखल करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने ईडीला नोटीस बजावली आहे. ईडी प्रकरणात सिसोदिया यांच्या जामिनावर या प्रकरणाची सुनावणी २५ मार्च रोजी होणार आहे.