Video: "साहेब मला वाचवा, माझी बायको गरम चिमट्याने मारते" तक्रारदार ढसाढसा रडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

Video: "साहेब मला वाचवा, माझी बायको गरम चिमट्याने मारते" तक्रारदार ढसाढसा रडला

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये पत्नी पतीला त्रास देत असलेली मजेशीर घटना घडली आहे. एका पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसही खळखळून हसले आहेत. माझी पत्नी आपल्याला गरम चिमट्याने मारते अशी तक्रार या व्यक्तीने पोलिसांसमोर ढसाढसा रडत दिली आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील हरीमपूर येथे घडली असून आपल्या पत्नीवर कारवाई करण्याची मागणी या व्यक्तीने केली आहे.

(Crime News Latest Updates)

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

अधिक माहितीनुसार, पत्नी आणि पतीमधील वाद कार विकण्यावरून झाल्याचं समोर आलं आहे. कार विकून माझी पत्नी तिच्या माहेरला पैसे देण्याचा विचार करत आहे. पण माझा कार विकण्याला विरोध असल्यामुळे ती माझ्यावर आत्याचार करते. ती मला गरम चिमट्याने मारते अशी तक्रार पीडित व्यक्तीने दिली. तर या आत्याचारापासून माझी सुटका करा अशी मागणी या व्यक्तीने पोलिसांकडे केलीये.

हेही वाचा: Asaram Bapu: जेलमध्ये बापूचं दहावं वर्ष; भक्त म्हणतायेत 'आता तरी सोडा'

"पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस कारवाई करत आहेत. अधिक चौकशीसाठी पीडितेच्या पत्नीला बोलावण्यात आले असून कायद्यानुसार पत्नीवर कारवाई केली जाणार आहे. पण हा विषय संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. लोक यावर मजा घेत आहेत" अशी माहिती पोलीस निरिक्षक राजेश कमल यांनी दिली.