पत्नीला झोपताना हवा होता पतीसोबत प्रियकरही...

वृत्तसंस्था
Friday, 20 September 2019

पत्नीला झोपताना पतीसोबत प्रियकरही हवा होता, यावरून वाद झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.

गोरखपूर (हरियाणा): पत्नीला झोपताना पतीसोबत प्रियकरही हवा होता, यावरून वाद झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गोरखपूर जिल्ह्यातील चिलुआताल क्षेत्रात ही घटना घडली आहे. परमानंद मिश्र (वय 40) यांनी आत्महत्या केली असून, त्यांच्या मुलगा प्रज्वलने आई व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे.

प्रज्वलने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमानंद मिश्र हे टेंम्पोचालक म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नीचे इंद्रजीत ओझासोबत अनैतिक संबंध होते. परमानंद हे कामानिमित्त बाहेर गेले की इंद्रजीत घरी येत असे. मंगळवारी रात्री परमानंद हे घरी आले होते. यावेळी इंद्रजीत घरीच होता. सर्वांनी एकत्र जेवण केल्यानंतर झोपण्याची तयारी केली. यावेळी परमानंद यांच्या पत्नीने प्रियकरालाही आपल्यासोबत झोपण्याचा आग्रह केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. अखेर इंद्रजीत ओझा निघाला असता त्याच्यासोबत पत्नीही बाहेर पडली. यामुळे प्रज्वलही त्यांच्यासोबत निघाला. घराबाहेर गेल्यानंतर काही वेळातच परमानंद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती प्रज्वलच्या छोट्या भावाने दिली.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife was trying to make the lover sleep with her husband at gorakhpur