नगरोटामध्ये हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांची जंगलातून घुसखोरी

पीटीआय
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या नगरोटा येथील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मागील बाजूस असलेल्या जंगलातून प्रवेश केल्याचे स्पष्ट होत आहे. या हल्ल्यासंदर्भातील माहिती सोमवारी एका अधिकारी सूत्राने दिली.

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या नगरोटा येथील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मागील बाजूस असलेल्या जंगलातून प्रवेश केल्याचे स्पष्ट होत आहे. या हल्ल्यासंदर्भातील माहिती सोमवारी एका अधिकारी सूत्राने दिली.

अतिसंवेदनशील भागात असलेल्या नगरोटा लष्करी तळावर दहशतवादी कसे काय घुसले, याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. या पार्श्‍वभूमीवर घुसखोरीबाबत अनेक बाजू उघड होत आहेत. सूत्रांच्या मते, लष्करी तळाच्या मागे असलेल्या जंगलातून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. या परिसराच्या चारही बाजूनी काटेरी कुंपण असून, लहान भिंतही उभारलेली आहे. त्यामुळे हल्लेखोरांनी जंगलाचा आश्रय घेत घुसखोरी केली. नगरोटामध्ये लष्करी तळावर 29 नोव्हेंबर रोजी हल्ला केला होता. आठ तासांहून अधिक काळ चालेल्या धुमश्‍चक्रीत दोन अधिकारी आणि पाच जवान हुतात्मा झाले. तसेच तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. नगरोटातील लष्करी तळ हे मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हल्ल्यानंतर लष्कराने तातडीने निवेदन प्रसिद्ध करत दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून आणि गोळीबार करत अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये घुसखोरी केल्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी एका ठिकाणी नगरोटा हल्ल्याची चौकशी सुरू असून, अंतिम अहवाल आल्यानंतरच काही गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगितले.

Web Title: Wild infiltrating terrorists to attack in Nagrota