'पाकला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन'

nc leader Akbar Lone
nc leader Akbar Lone

श्रीनगरः पाकिस्तानला जर कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन. पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची मैत्री वाढावी. त्या मैत्रिचा मी चाहता आहे, अशी मुक्ताफळे जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी उधळली आहे. नेटिझन्सनी अकबर लोन यांना ट्रोल केले आहे.

कुपवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना अकबर लोन म्हणाले, 'माझ्या पलीकडे असणारा देश हा मुस्लिमांचा देश आहे. पाकिस्तानसोबत आपली मैत्री कायम राहायला हवी. पाकिस्तानला जर कोणी एक शिवी दिली तर मी त्याला 10 शिव्या देईन. पाकिस्तान यशस्वी व्हावा आणि नेहमी खूष रहावा. शिवाय, आमची आणि त्यांची मैत्री वाढावी. त्या मैत्रीचा मी चाहता आहे.' अकबर लोन यांनी पाकिस्तानवर उधाळलेल्या मुक्ताफळांमुळे नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे.

अकबर लोन यांनी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. पाकिस्तानबद्दलचे प्रेम त्यांनी यापूर्वीही अनेकदा व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा त्यांनी दिल्या आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरू असताना भाजपचे काही आमदार सभागृहात पाकिस्तान विरोधी घोषणा देत होते, त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी अकबर लोन यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या त्यावेळीही वाद उफाळून आला होता.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांच्या मनात पाकिस्तानविरोधात चीड निर्माण झाली असतानाच अकबर लोह हे मात्र पाकिस्तानवर मुक्ताफळे उधाळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com