काही आठवड्यांतच गोव्यात - पर्रीकर 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

अमेरिकेत उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लवकरच परतणार आहेत. "काही आठवड्यांतच परत येईन' असे त्यांनी पाठविलेल्या ध्वनिचित्रफीत संदेशाद्वारे सांगितले आहे. पर्रीकर यांनी अमेरीकेत उपचारासाठी जाण्यापूर्वी असाच ध्वनिचित्रफीत संदेश जारी केला होता. त्या वेळेपेक्षा आज जारी केलेल्या ध्वनिचित्रफीतीत त्यांच्या आवाजात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले.
 

पणजी - अमेरिकेत उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लवकरच परतणार आहेत. "काही आठवड्यांतच परत येईन' असे त्यांनी पाठविलेल्या ध्वनिचित्रफीत संदेशाद्वारे सांगितले आहे. पर्रीकर यांनी अमेरीकेत उपचारासाठी जाण्यापूर्वी असाच ध्वनिचित्रफीत संदेश जारी केला होता. त्या वेळेपेक्षा आज जारी केलेल्या ध्वनिचित्रफीतीत त्यांच्या आवाजात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले.

"गोवा प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या मतदान केंद्र कार्यकर्ता संमेलनास माझ्या सर्वांना शुभेच्छा. गेले दोन महिने तब्येतीच्या कारणामुळे उपचारासाठी मी बाहेरगावी असल्याने आपणा सर्वांना भेटू शकलो नाही. माझ्यावर सुरू असलेले उपचार यशस्वी ठरत आहेत. ते पाहून मला असे वाटते, की येत्या काही आठवड्यांत तुम्हा सगळ्यांसोबत नेटाने सहभागी होऊ शकेन.' त्यांनी कार्यकर्त्यांनाही संदेश दिला आहे. "लोकसभेची निवडणूक एप्रिल-मेमध्ये होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन करायचे आहे. हे करण्यासाठी गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून मोठा विजय मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा,' असे पर्रीकर यांनी सांगितले आहे. 

Web Title: Will be back in Goa in few weeks says parrikar