esakal | ...तर राजकीय रणनितीकार म्हणून संन्यास घेईन; प्रशांत किशोर यांचा भाजपावर पलटवार

बोलून बातमी शोधा

prashant kishor}

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच सत्तेत येतील असा पुनरुच्चार राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे.

...तर राजकीय रणनितीकार म्हणून संन्यास घेईन; प्रशांत किशोर यांचा भाजपावर पलटवार
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच सत्तेत येतील असा पुनरुच्चार राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. तसेच भाजपवर पलटवार करताना  पश्चिम बंगालमध्ये जर भाजप सत्तेत आलं तर मी राजकीय रणनितीकार म्हणून सन्यास घेईल आणि दुसरं काहीतरी काम शोधेन, असंही किशोर यांनी म्हटलं आहे. इंडिया टीव्हीशी मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. 

मुख्यमंत्र्यांचे टोलेबाज भाषण; 'हा व्हायरस आहे, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतो'

प्रशांत किशोर म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये जर भाजपने १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या तर मी सध्याचं काम थांबवेन. मी दुसरं काहीतरी काम करेन पण हे काम करणार नाही. मी यापुढे कुठलाही राजकीय प्रचार करताना दिसणार नाही. आम्ही उत्तर प्रदेश गमावलं, आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला तिथं मिळालं नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी मला कामाचं स्वातंत्र्य दिलं. जर आम्ही पश्चिम बंगाल गमावलं तर मी हे मान्य करेन की मी या कामासाठी योग्य नाही." पश्चिम बंगाल भाजपला तेव्हाच मिळू शकतं जेव्हा तृणमूल काँग्रेस आपल्याच ओझ्याखाली दबेल. तृणमूलच्या अंतर्गत काही विरोधाभास आहे. मात्र, भाजप अशा प्रकारच्या जागा भरुन काढण्यात तज्ज्ञ आहे, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.  

'आयुष्यात खोटं बोललो नाही, बोलणार नाही'; विधिमंडळात मुख्यमंत्री गरजले!

भाजप आणि अमित शहा यांनी दावा केलाय की ते पश्चिम बंगालमध्ये २०० जागा जिंकतील. भाजपने आपला विजय होणार असल्याची केवळ हवा निर्माण केली आहे. मात्र, केवळ हवा तयार करुन आणि गोंधळ घालून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. बंगालमध्ये भाजपच्या काही सभांना केवळ २०० ते ३०० लोक उपस्थित होते, फक्त पंतप्रधान मोदींच्या सभांनाच येथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता, असंही यावेळी प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

SC-ST विद्यार्थ्यांसाठी ओडिशा सरकारचा महत्वाचा निर्णय; शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था
 
दरम्यान, प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले होते की, ममतांना आता प्रशांत किशोरही सोडून गेले आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल ऐकण्यापूर्वीच त्यांनी माघार घेतली आहे. ममतांचे सर्वांत मोठे सल्लागार आता दुसरीकडे रुजू झाले आहेत. यावरुन बरंच काही कळू शकतं.