2019 मध्ये मायावती आमच्यासोबत : राहुल गांधी

2019 मध्ये मायावती आमच्यासोबत : राहुल गांधी

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राजस्थान आणि मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मायावती काँग्रेससोबत असतील, असा विश्वास व्यक्त केला.

"काँग्रेसचे नेते उद्धट आहेत. काहीही झाले तरी बसपा काँग्रेसशी आघाडी करणार नाही'', असे मायावती यांनी  दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी यावर सांगितले, की ''राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपा काँग्रेससोबत नसल्यास काँग्रेसला जास्त फरक पडणार नाही. राज्यातील आघाडी आणि केंद्रातील आघाडी यामध्ये फरक आहे''. 

दरम्यान, आघाडीबाबत काँग्रेस पक्षातील काही नेते अडथळा आणत असल्याचे मायावती म्हणाल्या होत्या, त्यावर राहुल गांधी यांनी सांगितले, की ''आम्ही जागावाटपावर चर्चा करण्यास नेहमी तयार आहोत. चर्चेसाठी मी नेहमीच उपलब्ध असतो. आगामी लोकसभा निवडणुकीत बसपा काँग्रेससोबत नक्कीच आघाडी करेल''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com