#MeToo प्रकरणांसाठी समिती नेमणार : मनेका गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : #MeToo या मोहिमेंतर्गत लैंगिक शोषणाची विविध प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे यावर आता केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. ''#MeToo प्रकरणांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे'', अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज (शुक्रवार) दिली. 

गेल्या काही दिवसांपासून #MeToo मोहिमेंतर्गत विविध क्षेत्रातील महिला समोर आल्या आहेत. या महिला, तरुणी लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारने यावर गंभीर असून, त्यासाठी पावले उचलत आहे. त्यावर आज मनेका गांधी म्हणाल्या, ''लैंगिक शोषणाच्या प्रत्येक तक्रारींमागे काय त्रास आणि वेदना असतात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. नोकरीच्या ठिकाणी लैंगिक शोषणाला तक्रारींची जी प्रकरणे आहेत, ते अत्यंत कठोरपणे हाताळली पाहिजेत. असे प्रकार खपवून न घेण्याचे धोरण असले पाहिजे. त्यामुळे यावर बोलणाऱ्या आणि याबाबत तक्रारी करणाऱ्या सर्व महिलांवर आपला पूर्ण विश्वास आहे'', असे मनेका गांधी म्हणाल्या. 

तसेच त्या पुढे म्हणाल्या, ''#MeToo मोहिमेतंर्गत समोर येणाऱ्या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी न्यायिक आणि कायदेशीर सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचा मी प्रस्ताव देत आहे'', असे एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले. 
 
Web Title: Will Establish Committee for MeToo cases says Union Minister Maneka Gandhi