कॉंग्रेसला संसदेत उत्तर देण्यात येईल : केंद्र सरकार

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर कॉंग्रेसने टीका केल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसला उत्तर देण्यात येईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर कॉंग्रेसने टीका केल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसला उत्तर देण्यात येईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजु म्हणाले, "लवकरच संसदेचे सत्र सुरू होणार आहे. संसदेमध्ये जे प्रश्‍न उपस्थित होतील त्यांना उत्तर देणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर त्यांनी (कॉंग्रेसन) प्रश्‍न उपस्थित केला तर त्यास उत्तर देण्यात येईल. प्रश्‍न विचारायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे' तसेच "काळा पैसा, बनावट चलन आणि बेकायदेशीर व्यवहार दहशतवादाला प्रोत्साहन देतात. आता या धाडसी निर्णयानंतर अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र त्याला काहीही पर्याय नाही', असेही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर कॉंग्रेस, डावे पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष यांनी आरोप केले आहे. आम आदमी पक्षानेही मोदींवर टीका केली आहे. "मोदी यांनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांना कळविल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

Web Title: Will give befitting reply to Congress in Parliament on demonetisation: Centre