पंजाब जिंकून राहुल गांधींना भेट देवू- सिद्धू

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

या धर्मयुद्धात सत्याचा विजय होईल. आम्हाला विश्वास आहे, की पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल. येथूनच काँग्रेसचा झेंडा फडकण्याचे काम सुरु होईल. 

अमृतसर - आम्हाला विश्वास आहे, की पंजाबमध्ये पुढील सरकार काँग्रेसचेच असेल. पंजाबमधून काँग्रेसला पुन्हा पुनरुज्जीवीत करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट देवू, असे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले.

पंजाबमध्ये आज (शनिवार) विधानसभेसाठी मतदान होत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्षामध्ये लढत होत आहे. सिद्धू यांनी नुकताच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढत आहे.

पत्नी नवज्योत कौर यांच्यासह सिद्धूने मतदानाचा हक्क बजाविला. यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धू म्हणाले, की या धर्मयुद्धात सत्याचा विजय होईल. आम्हाला विश्वास आहे, की पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल. येथूनच काँग्रेसचा झेंडा फडकण्याचे काम सुरु होईल. 

Web Title: Will give Rahul Gandhi great gift with Congress' revival says Navjot S.Sidhu