...अन् मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्याआधी मी डिटेन्शन सेंटरमध्ये असेल

वृत्तसंस्था
Saturday, 15 February 2020

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व्यवहार्य नसल्याचं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. कोणालाही डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन देखील त्यांनी केले आहे.

जयपूर : सीएए, एनआरसी विरोधात देशभऱात सध्या आंदोलने सुरु आहेत. या कायद्यांना अनेकांनी विरोध दर्शविला आहे. आता काॅग्रेसचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या कायद्यांवरून भाजपवर कठोर शब्दात टीका केली.  

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व्यवहार्य नसल्याचं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. कोणालाही डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन देखील त्यांनी केले आहे. डिटेन्शन सेंटरमध्ये जाण्याची वेळ आलीच, तर त्यावेळी सर्वात पुढे मीच असेन, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ( एनआरसी ) आम्हाला मान्य नाही, असं म्हणत गेहलोत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस देशवासीयांसोबत असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही, असंदेखील ते म्हणाले. राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या शहीद स्मारक परिसरात सीएए, एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे.

Image result for ashok gehlot

PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

काल रात्री गेहलोत आंदोलनस्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी भाजपावर टीका केली. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे. केंद्रीय मंत्री आणि यांचे (भाजपाचे) सगळे मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. नीतिश कुमारही गेले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भावना भडकावण्यासाठी तिथे जाऊन आले. मात्र दिल्लीकरांनी त्यांना शिकवलेला धडा इतिहास लक्षात ठेवेल, असं गेहलोत म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ ८ जागा मिळाल्या. तर आम आदमी पार्टीनं ७० पैकी ६२ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. भाजपला आता उतरती कळा लागली असल्याची टीका त्यांनी यावे्ळी बोलताना केली.  

गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will go detention camp says rajasthan cm ashok gehlot opposes nrc caa