'गायीला मारणाऱ्याला लटकवणार'; छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

रायपूर (छत्तीसगढ) - छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांना "राज्यात गोहत्येबाबत काही कायदा करण्यात येणार आहे का?' असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी "गायीला मारणाऱ्याला लटकवणार' असे वक्तव्य केले आहे.

रायपूर (छत्तीसगढ) - छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांना "राज्यात गोहत्येबाबत काही कायदा करण्यात येणार आहे का?' असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी "गायीला मारणाऱ्याला लटकवणार' असे वक्तव्य केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात मटणाची टंचाई निर्माण झाली असून सरकारवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर रमण सिंह यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी "छत्तीसगढमध्ये गोहत्येसाठी काही कायदा आणण्यात येणार आहे का?' असा प्रश्‍न विचारला. त्यावर "गेल्या 15 वर्षांत काहीही (गोहत्या) झालेले नाही. मात्र कोणी (गोहत्या केली) केले तर त्याला लटकवून टाकू', असे उत्तर त्यांनी दिले.

Web Title: 'Will Hang Those Who Kill Cows,' Says Chhattisgarh CM Raman Singh