राजकारणासाठी रजनीकांत यांच्यासोबत हात मिळवण्यास तयार: कमल हसन

वृत्तसंस्था
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कमल हसन यांनी नुकतेच एका मुलाखतीत नवी पक्ष स्थापन करणार असल्याचे सूचित केले होते. तमिळनाडूतील स्थानिक निवडणूक लढविण्याची तयारी ते करीत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून हसन तमिळनाडूतील राजकारणाचे वाभाडे काढताता दिसत आहेत.

नवी दिल्ली - प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत राजकारणात येणार असतील तर त्यांच्यासोबत हात मिळवण्यास तयार असल्याचे अभिनेते कमल हसन यांनी सांगितले. कमल हसन यांनी नवी राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कमल हसन यांनी नुकतेच एका मुलाखतीत नवी पक्ष स्थापन करणार असल्याचे सूचित केले होते. तमिळनाडूतील स्थानिक निवडणूक लढविण्याची तयारी ते करीत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून हसन तमिळनाडूतील राजकारणाचे वाभाडे काढताता दिसत आहेत. राज्यात राजकीय पोकळी असून, ती भरून काढण्यासाठी हसन राजकीय पक्ष काढतील, अशी चर्चा आहे. यासाठी या महिनाअखेरचा मुहूर्त सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर हसन यांच्याकडून राजकीय प्रवेशाबाबत घोषणा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. 'मी राजकारणात प्रवेश केलाच, तर माझा रंग 'भगवा' नसेल हे निश्चित आहे' असे वक्तव्य करत हसन यांनी काही दिवसांपूर्वी राजकारण प्रवेशाचे आणि संभाव्य धोरणांचे संकेत दिले होते.

मागील काही काळात हसन यांनी केलेल्या विधानांवर जनेतकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच, हसन त्यांच्या चाहत्यांच्या गटांना भेट देत असून, नव्या पक्षाचा आराखडा बनवत आहेत. कमल हसन म्हणाले, की राजकारणात मी आणि रजनीकांत एकत्र आले तर अनेक प्रश्न उपस्थित होतील. पण, त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर मी त्यांच्यासोबत हात मिळवण्यास तयार आहे. 

Web Title: Will join hands with Rajinikanth if he enters politics: Kamal Haasan