कर्नाटकमधील चिंचोली येथे एका उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना रविवारी खर्गे यांनी हे वक्तव्य केले आहे. खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मोदींनी सभांमध्ये काँग्रेसला 40 पेक्षा अधिक जागा मिळू शकत नाहीत, असे म्हटले होते. यावर खर्गे यांनी हे वक्तव्य केले आहे.
बंगळुरू : काँग्रेसला या निवडणुकीत 40 पेक्षा कमी जागा मिळतील असा सतत दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी निकालानंतर काँग्रेसला 40 पेक्षा अधिक जागा मिळाल्यानंतर दिल्लीतील विजय चौकात फाशी घेणार का? असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.
कर्नाटकमधील चिंचोली येथे एका उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना रविवारी खर्गे यांनी हे वक्तव्य केले आहे. खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मोदींनी सभांमध्ये काँग्रेसला 40 पेक्षा अधिक जागा मिळू शकत नाहीत, असे म्हटले होते. यावर खर्गे यांनी हे वक्तव्य केले आहे.
खर्गे म्हणाले, की मोदी म्हणतात काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाहीत. जर काँग्रेसला 40 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास मोदी दिल्लीतील विजय चौकामध्ये स्वत:ला फाशी लावून घेणार आहेत का? इथे बसलेले लोक देशाचे भविष्य लिहिणार आहेत. मोदी जिथे जिथे जातात तिथे सांगतात की काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 40 जागासुद्धा मिळणार नाहीत. तुमच्यापैकी कुणाचा यावर विश्वास बसतो का.