साध्वीला मी कधीच माफ करणार नाही- नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आपण कधीच साध्वी प्रज्ञाला माफ करणार नाही असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आपण कधीच साध्वी प्रज्ञाला माफ करणार नाही असं म्हटलं आहे.

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं होतं. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी हे अत्यंत चुकीचं असून, त्यांना कधीच माफ करणार नाही असं म्हटलं आहे.

साध्वींच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं मोदींना विचारलं असता मोदी म्हणाले की, हे वक्तव्य घृणास्पद आहे. कुठल्याही सभ्य समाजात अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाऊ शकत नाहीत. गांधीजींबद्दल असं काही बोलणं निषेधार्थच आहे. साध्वी प्रज्ञा यांनी झाल्या प्रकारची माफी मागितली हे खरं. पण मी मनापासून त्यांना माफ करू शकणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will never forgive Sadhvi Pragya for insulting Gandhi, says PM Modi