सोशल मिडीयाचा आधार घेणे चुकीचे- लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

काश्मीरमध्ये लष्कराचे काम गर्व करण्यासारखे आहे. सीमेपलिकडून छुपे युद्ध सुरु असले तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) शांतता असावी, अशी आमची इच्छा आहे.

नवी दिल्ली - जवानांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी थेट मला येऊन भेटावे. सोशल मिडीयाच्या माध्यमांतून तक्रारी केल्यास त्याचा परिणाम सीमेवरील वीर जवानांच्या मनोधैर्यावर होतो. सोशल मिडीयाचा आघार घेणे चुकीचे असून, लवकरच अशा प्रकारे सोशल मिडीयावर तक्रारी करणारे गुन्ह्यांच्या श्रेणीत येऊ शकेल, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले.

सोशल मीडियावर बीएसएफ जवानाचा व्हिडिओ 'व्हायरल' झाल्यानंतर देशभर खळबळ माजली असतानाच, लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज (रविवार) लष्करी दिनानिमित्त बिपिन रावत यांनी जवानांना संबोधित केले.

रावत म्हणाले, की काश्मीरमध्ये लष्कराचे काम गर्व करण्यासारखे आहे. सीमेपलिकडून छुपे युद्ध सुरु असले तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) शांतता असावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असेल तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. जवानांनी सोशल मिडीयाचा आधार घेणे चुकीचे आहे.

Web Title: Will not shy away from giving befitting reply to ceasefire violations: Army Chief Gen Bipin Rawat