नोटाबंदीऐवजी राजीनामा दिला असता

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - आपण जर अर्थमंत्री असतो, तर पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला असता आणि त्यातूनही त्यांनी अंमलबजावणी करण्यास सांगितले असते, तर राजीनामा दिला असता, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
यांनी केले आहे.

नवी दिल्ली - आपण जर अर्थमंत्री असतो, तर पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला असता आणि त्यातूनही त्यांनी अंमलबजावणी करण्यास सांगितले असते, तर राजीनामा दिला असता, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
यांनी केले आहे.

येथील एका कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या सरकारचा हा निर्णय म्हणजे नोटाबंदी नसून नोटबदली आहे, असा टोमणाही त्यांनी या वेळी मोदी सरकारला मारला. तुमचा निर्णय 45 कोटी नागरिकांच्या फायद्याचा असेल, तर त्याला विरोध नाही; मात्र तुमच्या निर्णयाने नागरिकांना उधारी आणि भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले आहे, असे ते म्हणाले.
हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात बेबनाव आहे काय? या प्रश्‍नाला चिदंबरम यांनी उत्तर देणे टाळले. आपणच हा प्रश्‍न उपस्थित करत असल्याचे मला वाटते, असे ते म्हणाले. त्यांच्यात मतभेद असले तरी वादविवाद नाहीत.

संयुक्त जनता दलाचे पवन वर्मा म्हणाले, की या प्रश्‍नावर संसदेचे कामकाज रोखणे चुकीचे आहे. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते गोंधळ घालतात. पंतप्रधानांना बोलण्याची संधी द्यायला हवी; मात्र विरोधक संसदेत गोंधळ करत आहेत. या सत्रात एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी सभागृहाची कार्यवाही स्थगित करण्यात आली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Will prefere resignation instead of currency ban