पुढील 5 वर्षांसाठी मीच मुख्यमंत्रिपदावर : एच. डी. कुमारस्वामी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

पुढील 5 वर्षांसाठी धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेसचे सरकार अस्तित्वात असेल. या कार्यकाळासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर मीच असेल.

-  एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री, कर्नाटक

बंगळूरु : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांनी पुढील 5 वर्षांसाठी धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेसचे सरकार अस्तित्वात असेल आणि या कार्यकाळात कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर मीच असेल, असा विश्वास कुमारस्वामी यांनी व्यक्त केला. 

karnataka assembly

 

बंगळुरु येथील पत्रकार परिषदेत कुमारस्वामी बोलत होते. ते म्हणाले, मला विश्वास आहे, की पुढील 5 वर्षांसाठी मीच मुख्यमंत्रिपदावर असेन. तसेच सर्वांच्या सहकार्याने राज्यात स्थिर सरकार असेल. कुमारस्वामींनी कर्नाटकच्या जनतेचा मी सेवक आहे, असेही सांगितले. मला विश्वास आहे, की 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रिपदाला कोणताही धक्का पोचणार नाही. मी माझ्या मुख्यमंत्रिपदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे.

Web Title: Will Remain Chief Minister For Next 5 Years says HD Kumaraswamy