...तर तिहेरी तलाक कायदा रद्द : काँग्रेस

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत.

लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. अल्पसंख्याकांमध्ये काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी बोलताना सुष्मिता देव म्हणाल्या, 'तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना कारागृहात पाठवण्याचे षडयंत्र आहे. आपण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे आभर मानले.'

भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा नीट पाहिला तर तुम्हाला भीती दिसेल. मोदींनी ओळखले आहे की देशातील जनतेला विभागून पंतप्रधान बनू शकत नाही. भाजपवाले म्हणत होते की मोदी 15 वर्षे पंतप्रधानपदी राहतील, पण या वाक्याची आता गंमत उडवली जाते. यापूर्वी भाजपचे लोक म्हणत होते की, अच्छे दिन येतील, पण आता देशातील नागरिक म्हणत आहेत की चौकीदार चोर आहे. हा देश किती एका धर्माचा नाही. हा देश भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. लढाई दोन विचारधारांमधील आहे. अल्पसंख्यांकांनीही या देशासाठी काम केले आहे. एक विचारधारा म्हणते, देश सोन्याची चिमणी आहे, याचा अर्थ असा की, देश एक उत्पादन आहे. आमच्या विचारधारेनुसार, देश एक नदी आहे, ज्यात सगळ्यांना जागा मिळायला हवी.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Scrap Triple Talaq If Comes To Power Says Congress