जीवात जीव असेपर्यंत राहुल गांधींसोबत : सिद्धू

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

''मी पंजाब काँग्रेसचे धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांच्या प्रार्थनेमुळे मी आज इथे आहे. मी राहुल गांधीजी आणि प्रियांका गांधीजी यांना याबाबत मेसेज पाठविला आहे. मी त्यांना सांगितले, की माझे जीवन तुमच्यासाठी आहे''. 

- नवज्योतसिंग सिद्धू, मंत्री, पंजाब

नवी दिल्ली : ''राहुलभाई तडफदार नेते आहेत. मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मेसेज केला, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत असेन", असे पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. सत्ताधारी काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागत आहे. असे असताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविण्याबाबत विधान केले. ते म्हणाले, ''2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आता जी परिस्थिती आहे. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल. आघाडी त्यांच्यासोबत येईल. सिद्धू त्यांच्या (राहुल गांधी) सोबत उभा असेल'', असे सिद्धू यांनी ट्विटरवरून सांगितले. 

Rahul gandhi

तसेच ''मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मेसेज केला आहे. जोपर्यंत माझ्यात जीव आहे, तोपर्यंत मी तुमच्यासोबत असेन, असे मी त्यांना सांगितले आहे''. 

''मी पंजाब काँग्रेसचे धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांच्या प्रार्थनेमुळे मी आज इथे आहे. मी राहुल गांधीजी आणि प्रियांका गांधीजी यांना याबाबत मेसेज पाठविला आहे. मी त्यांना सांगितले, की माझे जीवन तुमच्यासाठी आहे''. 

Web Title: Will stand by Rahul Gandhi till my blood is flowing says Navjot Singh Sidhu