दिव्यांग मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार : सत्यपाल सिंह 

पीटीआय
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : दिव्यांग मुलांच्या वाहतुकीवर, पुस्तकांवर, गणवेशावर झालेल्या खर्चाची भरपाई सरकारकडून शाळांना केली जाईल आणि तसे निर्देश शाळांना दिल्याचे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी सांगितले. नॅशनल सेंटर फॉर प्रोमोशन ऑफ इम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल अँड मायंडेट्रीच्या वतीने आयोजित हेलन केलर-2018 च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

देशात एक कोटी 20 लाख अपंग असताना त्यापैकी केवळ एक टक्के लोक शिक्षण घेत असल्याचे सत्यपाल सिंह यांनी सांगितले. अपंग, दिव्यांग मुलांना केवळ भरपाई आणि मदत करून भागणार नाही, तर त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करणे गरजेचे आहे. देशातील सर्व दिव्यांग, अपंगांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी सरकारकडून अशा मुलांना सुविधा पुरवणाऱ्या शाळांना संपूर्ण खर्च दिला जाईल.

याशिवाय दिव्यांग मुलीला दरमहा 200 रुपये भत्ताही दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांचे किमान पाच टक्के प्रवेश होणे गरजेचे आहे, असेही सांगितले. दिव्यांग विद्यार्थी, नागरिक हे हक्कापासून वंचित राहू नयेत आणि त्यांच्यात आव्हान पेलण्याची सक्षमता निर्माण व्हावी, यासाठी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे सिंह म्हणाले. 

Web Title: Will take up the expenses for Divyang Childrens Education says Satyapal Singh