शांततेविषयी पाकचे वक्तव्य गांभीर्याने घेणार - सीतारामन

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

"सरकारच्या निर्णयाचा आदर करू' 
रमझानच्या काळात जम्मू-काश्‍मीरमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असला, तरी पाकिस्तानकडून त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे भारत आपल्या निर्णयावर ठाम राहणार का?, असे विचारले असता, सीतारामन म्हणाल्या, की केंद्र सरकारने घेतलेल्या जे जाहीर केले आहे, त्याला सुरक्षा दले बांधिल असतील. भारत सरकारच्या वतीने गृह मंत्रालयाने जे धोरण आखले आहे, त्या पूर्णपणे आदर केला जाईल. 

नवी दिल्ली-  भारत व पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची भाषा पाकिस्तान करीत असेल, तर भारताकडून ही बाब गंभीरतेने घेतली जाईल, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

भारत व पाकिस्तानमधील दीर्घकाळापासून सुरू असलेला संघर्ष थांबविण्याच्या बाजूने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बोलत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, की जम्मू-काश्‍मीरमध्ये रमझानच्या महिन्यात सरकारने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असून, सशस्त्र दले त्याचे पूर्णपणे पालन करतील. भारत व पाकिस्तानमधील वादावर चर्चा करून शांततेने तोडगा काढण्याची इच्छा पाकिस्तानी लष्कराकडून व्यक्त होत असल्याबद्दल सीतारामन यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, की शांततेसाठी कोणी भाष्य करीत असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल. "कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात त्या बोलत होत्या. 

"दोन्ही देशांमध्ये काश्‍मीरसह असलेले वाद चर्चा करून शांततेने सोडविण्यात येतील,' असे वक्तव्य पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी गेल्या महिन्यात केले होते. भारताशी चर्चा करण्यात पाकिस्तान कधीही तयार होत नाही, असे वर्षानुवर्षाचा अनुभव असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बाज्वा यांचे हे वक्तव्य केले होते.

"सरकारच्या निर्णयाचा आदर करू' 
रमझानच्या काळात जम्मू-काश्‍मीरमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असला, तरी पाकिस्तानकडून त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे भारत आपल्या निर्णयावर ठाम राहणार का?, असे विचारले असता, सीतारामन म्हणाल्या, की केंद्र सरकारने घेतलेल्या जे जाहीर केले आहे, त्याला सुरक्षा दले बांधिल असतील. भारत सरकारच्या वतीने गृह मंत्रालयाने जे धोरण आखले आहे, त्या पूर्णपणे आदर केला जाईल. 

Web Title: Will take Pakistan's statement seriously about peace says Sitaraman