काश्मीर काल, आज आणि यापुढेही आमचाच : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

''काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची जगातील कोणामध्येही ताकद नाही. देशाच्या रक्षणासाठी आवश्यकता असल्यास आम्ही सीमापार जाऊन कारवाई करून त्यांचा विरोध करू''.

- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली : ''काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची जगातील कोणामध्येही ताकद नाही. देशाच्या रक्षणासाठी आवश्यकता असल्यास आम्ही सीमापार जाऊन कारवाई करून त्यांचा विरोध करू'', असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. ''काश्मीर काल, आज आणि यापुढे कायम आमचाच असेल. आमच्यापासून कोणीही तो वेगळा करू शकत नाही'', असेही ते म्हणाले. 

'सीएनएन न्यूज 18' च्या परिषदेत राजनाथसिंह बोलत होते. यावेळी त्यांनी भारताला शत्रूंपासून वाचविणाऱ्या भारतीय लष्कराची प्रशंसा केली. तसेच त्यांनी पाकिस्तानला सूचना दिली. ते म्हणाले, आम्ही भारतात सुरक्षित आहोत. पण गरज असल्यास देशाच्या रक्षणासाठी आम्ही सीमापार जाऊन कारवाई करणार आहोत.

दरम्यान, भारताकडून पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहशतवाद्यांना मिळणारा निधी बंद करण्यात आला. त्यानंतर आता अमेरिका पाकिस्तानचा निषेध करत आहे. मला माहिती नाही पाकिस्तानची मानसिकता काय आहे. आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत. मात्र, भारताने दिलेली मैत्रीची ऑफर पाकिस्तानने स्वीकालेली नाही. काश्मीर प्रश्नावर सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. 

ते पुढे म्हणाले, काश्मीरमधील निरागस तरूणांना जिहादबाबत शिकवण दिली जात आहे. या सर्व तरुणांनी पहिले इस्लाममध्ये काय संकल्पना आहे, हे समजू घेतले पाहिजे.

Web Title: Willing to cross border to protect Kashmir says Union Home Minister Rajnath Singh