विंग कमांडर वर्धमान पुन्हा मिग-21 मध्ये

पीटीआय
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

पाकिस्तानचे विमान पाडल्यानंतर यंदाच्या फेब्रुवारीत जखमी झालेले विंग कमांडर वर्धमान सुमारे सहा महिने उड्डाणापासून दूर होते. त्यांनी पुन्हा उड्डाणाला सुरवात केल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानचे "एफ-16' हे लढाऊ विमान पाडताना दाखविलेल्या शौर्याबद्दल विंग कमांडर वर्धमान यांना नुकताच वीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पुन्हा "मिग-21' या लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून कामावर रुजू झाले आहेत.

पाकिस्तानचे विमान पाडल्यानंतर यंदाच्या फेब्रुवारीत जखमी झालेले विंग कमांडर वर्धमान सुमारे सहा महिने उड्डाणापासून दूर होते. त्यांनी पुन्हा उड्डाणाला सुरवात केल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानचे "एफ-16' हे लढाऊ विमान पाडताना दाखविलेल्या शौर्याबद्दल विंग कमांडर वर्धमान यांना नुकताच वीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wing Commander varthaman abhinandan in mig 21